Mumbai, मार्च 24 -- Tamim Iqbal Heart attack : बांगलादेशचा माजी कर्णधार आणि दिग्गज खेळाडू तमिम इक्बाल याला हृदयविकाराचा झटका आला आहे. विशेष म्हणजे, सामना खेळत असताना तमीम इक्बालला हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, तमीम इक्बाल ढाका प्रीमियर लीग (DPL) मध्ये मोहम्मडन स्पोर्टिंग क्लबकडून खेळत होता. क्षेत्ररक्षण करताना तमिम इक्बालच्या छातीत दुखू लागले.

ढाका प्रीमियर लीगमध्ये आज (२३ मार्च) मोहम्मडन स्पोर्टिंग क्लब आणि शाइनपुकुर क्रिकेट क्लबचे संघ आमनेसामने होते. यादरम्यान तमिम इक्बालला हृदयविकाराचा झटका आला.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, तमीम इक्बालला फिल्डिंग करताना अस्वस्थ वाटू लागले, त्यानंतर त्याला फजिलातुनेशा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, तमिम इक्बालचा वैद्यकीय अहवाल अद्याप जाही...