Haryana, मार्च 3 -- हरियाणातील रोहतक जिल्ह्यातील सांपला बसस्थानकावर शनिवारी एक सूटकेस सापडली. त्यात एका तरुणीचा मृतदेह असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तपास पुढे गेला असता मृत महिला स्थानिक काँग्रेस नेत्या असून तिचे नाव हिमानी नरवाल असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणाच्या दुसऱ्याच दिवशी पोलिसांना या प्रकरणाच्या तपासाला यश आले आणि एका आरोपीला अटक करण्यात आली. सचिन असे आरोपीचे नाव आहे. आता या खून प्रकरणाचे गूढ उलघडत आहे.

या कथेतील आतापर्यंत हिमानी आणि सचिन ही दोन महत्त्वाची पात्रे समोर आली असून या घटनेची कथा नातेसंबंधांचे व्हिडिओ बनवून त्यांना ब्लॅकमेल करून लाखो रुपये उकळण्याभोवती फिरताना दिसत आहे.

कोण हत्या हिमानी नरवाल?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सक्रिय काँग्रेस कार्यकर्त्या हिमानी सोनीपतमधील कथुरा गावची रहिवासी होत्या. सोशल मीडियावर या तरु...