Mumbai, एप्रिल 24 -- RBI Restrictions on Kotak Mahindra Bank : उल्हासनगरमधील कोणार्क अर्बन सहकारी बँकेवरील कारवाईची बातमी ताजी असतानाच आणखी एका बँकेवरील निर्बंधांची बातमी समोर आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं कोटक महिंद्रा या आघाडीच्या बँकेवर कारवाईचा बडगा उगारला आहे. आरबीआयनं कोटक बँकेच्या ऑनलाइन आणि मोबाइल बँकिंगवर तात्काळ प्रभावानं बंदी घातली आहे.

* आरबीआयने 2022 आणि 2023 च्या आयटी परीक्षेत उपस्थित केलेल्या चिंतांमुळे बँकिंग नियमन कायदा, 1949 च्या कलम 35 ए अंतर्गत कारवाई केली.

* आरबीआयला आयटी इन्व्हेंटरी, पॅच मॅनेजमेंट, युजर अॅक्सेस, व्हेंडर जोखीम, डेटा सिक्युरिटी आणि डिझास्टर रिकव्हरीमध्ये महत्त्वपूर्ण कमतरता आढळल्या.

आयटी इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, पॅच अँड चेंज मॅनेजमेंट, युजर अॅक्सेस मॅनेजमेंट, व्हेंडर रिस्क मॅनेजमेंट, डेटा सिक्युरि...