Mumbai, फेब्रुवारी 13 -- Stock Market : कोटक महिंद्रा बँकेवर गेल्या नऊ महिन्यांपासून घातलेली बंदी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) उठवली आहे. आरबीआयच्या या निर्णयानंतर कोटक महिंद्रा बँकेचे शेअर कमालीचे वधारले असून भावानं ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला आहे.

बँकेचा शेअर बुधवारी १.४० टक्क्यांनी वधारून १,९४५.५० रुपयांवर बंद झाला. आज तो १९६३ रुपयांवर खुला झाला. मागील बंदच्या तुलनेत तो जवळपास १ टक्क्यानं वधारला. उघडल्यानंतर काही मिनिटांतच हा शेअर १९८७.७० रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. बंदी असतानाही खासगी बँकेच्या शेअरनं गेल्या सहा महिन्यांत १३ टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. तर, गेल्या महिन्याभरात त्यात सुमारे २४ टक्के वाढ झाली आहे.

रिझर्व्ह बँकेनं कोटक महिंद्रा बँकेवर एप्रिल २०२४ पासून निर्बंध लागू केले होते. या अंतर्गत आर...