Mumbai, फेब्रुवारी 11 -- Samay Raina Controversial Show : 'इंडियाज गॉट लॅटेंट'च्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एपिसोडवरून झालेल्या गदारोळानंतर हा वादग्रस्त भाग युट्यूबवरून हटवण्यात आला आहे. युट्यूबर पॉडकास्टर रणवीर अलाहाबादिया आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अपूर्वा मखीजा हे दोघे समय रैनाच्या या कॉमेडी शोमध्ये दिसले होते. या शोमध्ये दोघांनी जी काही वक्तव्य केली, त्यावर बरीच टीका झाली होती. भारत सरकारच्या आदेशानंतर आता युट्यूबने तो एपिसोड ब्लॉक केला आहे.

कॉमेडियन समय रैनाचा कॉमेडी शो 'इंडियाज गॉट लॅटेंट' सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये रणवीर अलाहाबादियाने एका स्पर्धकाच्या आई-वडिलांवर केलेल्या अश्लील कमेंटने खळबळ उडवून दिली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वरिष्ठ सल्लागार कांचन गुप्ता यांनी आपल्या अधिकृत ...