भारत, एप्रिल 16 -- कॅपॅसिट इन्फ्राप्रोजेक्ट्स लिमिटेडचा शेअर आज २ टक्क्यांहून अधिक वधारला आहे. या तेजीमागचं कारण म्हणजे कंपनीचं अपडेट, ज्यात कंपनीने 295 कोटी रुपयांच्या कॉन्ट्रॅक्टची घोषणा केली आहे. कंपनीचा शेअर आज इंट्राडे उच्चांकी पातळीवर ३८२.७० रुपयांवर पोहोचला. ३.२१ हजार कोटी रुपयांची मार्केट कॅप कंपनी असलेल्या कॅपॅसिट इन्फ्राप्रोजेक्ट्सचा शेअर सकाळी एनएसईवर ३७६.५० रुपयांवर उघडला.

कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील वडाळा परिसरातील निवासी आणि व्यावसायिक इमारत क्रमांक ०१ आणि ०२ च्या बांधकामासाठी कॅपॅसिट इन्फ्राप्रोजेक्ट्स लिमिटेडला २९५ कोटी रुपयांची (जीएसटी स्वतंत्र) ऑर्डर मिळाली आहे. इंडस को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीकडून हा आदेश प्राप्त झाला आहे.

कंपनीने बीएसईला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, हा प्रकल्प कंपनीच्या न...