New delhi, फेब्रुवारी 15 -- रशियन दारू विक्रेत्याने बिअरच्या कॅनवर महात्मा गांधींची प्रतिमा वापरली आहे. यामुळे सोशल मीडियावर युजर्स संतापले असून त्यांनी पंतप्रधान मोदींना हा मुद्दा रशियासमोर मांडण्याचे आवाहन केले आहे. रशियन ब्रँड रिव्हर्टने बनवलेल्या बिअरच्या डब्यांचे फोटो ऑनलाइन समोर आल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. कंपनीने या बिअरला महात्मा गांधी यांचे नावही दिले आहे. ओडिशाच्या माजी मुख्यमंत्री नंदिनी सत्पथी यांचे नातू आणि राजकारणी सुपर्णो सत्पथी यांनीही एक्सवर याचे फोटो शेअर केले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माझी नम्र विनंती आहे की, त्यांनी आपले मित्र रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासमोर हा मुद्दा उपस्थित करावा. एक रशियन व्यक्ती गांधीजींच्या नावाने बिअर विकत असल्याचे समोर आले आहे. बिअरच्या कॅनवर महात्मा गांधींचे छाय...