राजस्थान, फेब्रुवारी 7 -- Rajasthan Accident : भिलवाडा जिल्ह्यातील कोत्री भागातील ८ मित्र प्रयागराज येथे कुंभमेळ्यासाठी जात असतांना दुर्दैवी घटना घडली आहे. राजस्थानमधील जयपूर-अजमेर मार्गावर मौखमपुराजवळ समोरून येणाऱ्या भरधाव बसचा टायर फुटून त्यांच्या कारला बसची धडक बसल्याने झालेल्या भीषण अपघातात आठही जणांचा मृत्यू झाला. तर ६ जण जखमी झाले. हा अपघात एवढा भीषण होता की कारचा अक्षरक्ष: चक्काचूर झाला. ही घटना गुरुवारी दुपारी घडली.

दिनेश कुमार, सुरेश रेगर, बबलू मेवाडा, जानकीलाल, रविकांत मदनलाल, मुकेश उर्फ ​​बाबू रेगर मुलगा मदनलाल, नारायणलाल बैरवा आणि प्रमोद सुथार असे या दुर्दैवी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ८ मित्रांची नावे आहेत. हे सर्व भीलवाडा जिल्ह्यातील कोत्री भागात राहत असून ते महाकुंभासाठी उत्तर प्रदेश येथे जात होते.

या अपघाताची माहिती देत...