Prayagraj, फेब्रुवारी 7 -- Fire Broke out in Iskcon kitchen in Mahakumbha : प्रयागराज येथील महाकुंभात शुक्रवारी सकाळी पुन्हा एकदा आगीची घटना उघडकीस आली आहे. तीन सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागली. इस्कॉनच्या स्वयंपाकघरात ही आग लागली.

कुंभमेळ्यात लागलेली ही आतापर्यंतची तिसरी मोठी आग आहे. मेळा परिसरातील सेक्टर-१८ शंकराचार्य मार्गावरील इस्कॉनच्या स्वयंपाकघराला शुक्रवारी सकाळी आग लागली. या आगीत अनेक राहुट्या जळून खाक झाल्या. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या पथकाने मोठ्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले आहे. या आगीत कोणीही जखमी झाले नाही. प्रत्यक्षात या कॅम्पमध्ये महाराज कॉटेज बसवण्यात आले होते, त्यात एसी लावण्यात आला होता. एसी गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहित...