Beed, फेब्रुवारी 5 -- भाजप आमदार सुरेश धस यांच्या आष्टी मतदारसंघातील खुंटेफळ साठवण तलाव प्रकल्पाचे लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते करण्यात आले. या लोकार्पण सोहळ्यानंतर आयोजित कार्यक्रमात आमदार सुरेश धस यांनी तुफान फटकेबाजी करत जिल्ह्यातील राजकारण व गुन्हेगारीवर भाष्य केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमदार सुरशे धस आणि मंत्री पंकजा मुंडे एकाच मंचावर आल्याचंही पाहायला मिळालं. बीडमधील राजकीय वातावरण तापलं असताना आज मंत्री पंकजा मुंडे व आमदार सुरेश धस एकाच मंचावर आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

सुरेश धस म्हणाले, मी काहीही बोललं की, बीड जिल्ह्याची बदनामी होतेय असं काहीजण म्हणतात. या जिल्ह्याने क्रांती सिंह नाना पाटील, बबनराव ढाकणे दिले,प्रमोद महाजन यांच्यासारखा उंचीचा माणूस निवडून दिला. गोपीनाथव मुंडे यांच्यासारखा प...