Kashmir, एप्रिल 22 -- जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे. दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य केले असून यामध्ये एका पर्यटकाचा मृत्यू झाला आहे, तर १२ जण जखमी झाले आहेत. दोन पर्यटकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. यातील तिघे स्थानिक रहिवासी आहेत. सुरक्षा दल आणि वैद्यकीय पथके घटनास्थळी दाखल झाली असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. पहलगामच्या बैसरन खोऱ्यातील एका पर्यटन रिसॉर्टच्या वरच्या गवताळ प्रदेशावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला, ज्यात पर्यटक जखमी झाले. हा टार्गेट स्ट्राईक होता, ज्यात दहशतवादी लपून बसले होते, असे मानले जात आहे.

हल्ल्याच्या ठिकाणी क्यूएटी पाठवण्यात आले असून दहशतवाद्यांनी घोड्यावर स्वार होताना पर्यटकांवर गोळीबार केल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात काही घोडेही जखमी झाले आहेत. गुप्तचर यंत्रणेच्य...