भारत, फेब्रुवारी 11 -- Nagpur Accident : नागपूरच्या बुटीबोरी एमआयडीसीत एक मोठी दुर्घटना घडली आहे. कार शिकत असतांना कारवरील नियंत्रण सुटल्याने ती विहिरीत जाऊन कोसळली. या अपघातात तीन तरूणांचा मृत्यू झाला आहे. अपघातग्रस्त कार आज सकाळी विहीरीतून बाहेर काढण्यात आली. मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे समजू शकली नाही.

नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी येथे कार शिकत असतांना तिघांचा मृत्यू झाला आहे. ही घटना नागपूरच्या बुटीबोरी एमआयडीसी परिसरात सोमवारी रात्री ११.३०च्या सुमारास घडली. बुटीबोरी येथे राहणारे तीन तरुण हे कारने एमआयडीसी परिसराच्या दिशेने जात होते. यातील एक तरुण हा कार शिकत होता. यावेळी कारवरील नियंत्रण सुटल्याने त्यांची कार ही कठडे नसलेल्या विहिरीत जाऊन कोसळली. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच बुटीबोरी पोलीस, स्थानिक ...