Pune, मार्च 3 -- Pune Swarget rape case : स्वारगेट एसटी आगार बलात्कार प्रकरणी आरोपीने तरुणीने पैसे घेतल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे तिने आरडा ओरडा केला नसल्याच्या युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला आहे. मात्र, पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. पीडित तरुणीने जीवाच्या भीतीने आरडा ओरडा केला नसल्याचे समोर आले आहे. आरोपीने तरुणीचा गळा दाबला व तिला मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तरुणीने आपल्याला जिवंत सोडावे, यासाठी तरुणीने आरोपी दत्तात्रय गाडे याच्याकडे याचना केली. याचाच फायदा घेऊन दत्तात्रय गाडे याने तरुणीवर अत्याचार केले.

दत्तात्रय गाडे याने तरुणीने तिच्या मर्जीने आपल्याशी शरीरसंबंध ठेवल्याचा दावा केला आहे. मात्र, प्रत्यक्षात ही तरुणी जीवाच्या भीतीने गप्प राहिली व तिने आरडाओरडा केला नसल्याचे समोर आले आहे. अत्याचारावेळी दत्तात्रय...