भारत, जानेवारी 28 -- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून शुल्क आकारण्याच्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर चीनी कंपनी डीपसीकने नवे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) मॉडेल सादर केले आहे. यामुळे व्यापार युद्धाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये तांत्रिक युद्ध होण्याची शक्यता वाढली आहे. डीपसीक हे एक चिनी एआय स्टार्टअप कंपनी आहे आहे, ज्याची स्थापना २०२३ मध्ये चीनमधील हांगझोऊ येथे झाली. २० जानेवारीला त्याचे ओपन सोर्स आर १ मॉडेल लाँच झाल्यानंतर ते जगाच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे.

डीपसीक ॲपल स्टोअर डाउनलोडमध्ये अव्वल स्थानी पोहोचले आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांना धक्का बसला आहे आणि काही अमेरिकन टेक शेअर्स घसरले आहेत. यामुळे अमेरिकेत खळबळ उडाली आहे. अमेरिकेबरोबरच्या या एआय टेक युद्धात गुप्त चिनी शस्त्र म्हणून डीपसीक आर १ व व्ही ३ चा प्रचा...