Mumbai, मार्च 13 -- महाराष्ट्रात सध्या हलाल आणि झटका मांसावरून राजकारण तापले आहे. भाजप नेते आणि महायुती सरकारमधील मंत्री नितेश राणे यांनी नुकतेच चिकन आणि मटण प्रेमींसाठी 'मल्हार सर्टिफिकेशन' सुरू केले. यावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर हिंदू दुकानदारांना 'झटका मटण' विक्रीसाठी 'मल्हार प्रमाणपत्र' देण्याची घोषणा करण्यात आली आहे. हिंदूंनी या प्रमाणित दुकानांमधूनच मटण खरेदी करावे, असे आवाहन राणे यांनी केले. या विधानावर बराच गदारोळ झाला आहे. त्यावर विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली आहे. विरोधी पक्ष याला धार्मिक फूट पाडण्याचे षडयंत्र म्हणत आहेत.

राज्य सरकारने अद्याप या उपक्रमाला अधिकृत पाठिंबा दिलेला नाही, त्यामुळे ही खरोखरच सरकारी योजना आहे की त्यामागे आणखी काही कारण आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे! पुणे जिल्हा ...