वॉशिंगटन, फेब्रुवारी 4 -- Elon Musk starts 120 hours work debate : डोनाल्ड ट्रम्प हे नुकतेच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाले आहे. त्यांच्या हा कार्यकाळ अनेक अर्थांनी वेगळा आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामापासून ते बेकायदा स्थलांतरितांना हद्दपार करण्यापर्यंतचा त्यांचा अजेंडा स्पष्ट आहे. सरकारी खात्यांमधील कामाचा वेग वाढविण्याची जबाबदारी त्यांनी थेट उद्योगपती एलॉन एलन मस्क यांच्यावर सोपवली आहे. दरम्यान, कामाच्या वेळांवरून भारतात मोठा वाद निर्माण झाला होता. आता एलॉन मस्क यांनी आठवड्यातून १२० तास काम करण्याचं समर्थन केलं असून त्यामुळे अमेरिकेत देखील यावरून नवा वाद होण्याची शक्यता आहे.

टेस्ला, एक्स सारख्या कंपन्यांचे मालक असलेल्या एलॉन मस्क हे त्यांच्या विलक्षण कार्यक्षमतेसाठी ओळखले जातात. एलॉन मस्क यांनी आता सरकारी कर्मचाऱ्यांना अध...