Mumbai, फेब्रुवारी 27 -- पुणे: कामाचे वाढते तास, ताण-तणाव आणि जीवनशैलीतील बदल हे त्या जोडप्यांच्या नातेसंबंधांवरही नकारात्मक परिणाम करतात. ज्यामुळे नात्यातील जवळीकता कमी होऊन मानसिकदष्ट्या ताण येतो आणि पालकत्वाचे स्वप्न पूर्ण करण्यात आणि गर्भधारणा करण्यात समस्या येतात. अशा जोडप्यांना एआरटी प्रक्रियेची( कृत्रिम गर्भधारणा) मदत घेतल्याने गर्भधारणेस मदत होऊ शकते.

हल्ली कामाचे वाढते तास आपल्या नैसर्गिक चक्रात व्यत्यय आणते ज्यामुळे पुरुष आणि महिला दोघांनाही शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या थकवा जाणवतो. कामाचे वाढते तास, तणाव आणि जीवनशैलीतील बदल जोडप्यांच्या एकूण आरोग्यावर परिणाम करते. जेव्हा शारीरिक आणि भावनिक आरोग्य बिघडते तेव्हा गैरसमज, ताण आणि अगदी नातेसंबंधातही असंतोष निर्माण होऊ शकतो आणि एकुणच गर्भधारणेवर नकारात्मक परिणाम होतो. कामाच्या अनियमित...