भारत, फेब्रुवारी 17 -- Congress MP Gaurav Gogoi wife ISI link : काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांच्या पत्नी एलिझाबेथ कोलबर्न यांच्यातील वाद अधिक चव्हाट्यावर आला आहे. भाजप आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी त्यांच्यावर आयएसआयशी संबंध असल्याचा आरोप केला होता. मात्र, रविवारी सरमा यांनी आपली भूमिका मवाळ करत विरोधी पक्षनेत्याविरोधात षडयंत्र रचले जाऊ शकते, असे सांगितले. गौरव गोगोई यांनी याप्रकरणी कायदेशीर मदत घेणार असल्याचे सांगितले. आसाम सरकारने राज्य सरकारला एका पाकिस्तानी अधिकाऱ्याविरोधात एफआयआर दाखल करण्यास सांगितले आहे. पाकिस्तान नियोजन आयोगाचे सल्लागार अली तौकीर शेख यांनी राज्याच्या कारभारात ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केल्याचा त्यांनी आरोप आहे.

गौरव गोगोई यांची पत्नी एलिझाबेथ यांचे पाकिस्तानी संबंध शोधण्यासाठी गुन्हा दाखल करण्यात ...