Pune, जानेवारी 31 -- Rvindra Dhangekar on the way to join Eknath Shinde Shivsena : राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीने जोरदार मुसंडी मारत मोठं यश मिळवलं. त्यानंतर आता स्थानिक स्वराज्य पक्षाच्या निवडणुकीसाठी हे पक्ष सज्ज झाले असून त्य दृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी पुन्हा ठाकरे गटासह आता काँग्रेसला सुद्धा मोठा धक्का देण्याची तयारी सुरू आहे. काँग्रेसचे कसबा पेटहेचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी मुंबईत एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यामुळे ते शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार या चर्चांना उधाण आले आहे. तर ठाकरे गटाचे देखील ३ माजी आमदार व ६ बडे नेते यांनी एकनाथ शिंदे याची भेट घेतल्याने उद्धव ठाकरे गटाचे देखील टेंशन वाढणार आहे.

राज्यात सध्या पक्षपक्षांतरं, नव्या नेतृत्त्वाची निवड या सारख्या राजकीय घडामोडींना वेग आ...