New delhi, जानेवारी 26 -- RepublicDay : भारत आज आपला ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक कर्तव्य पथावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. १६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आणि केंद्र सरकारची १० मंत्रालये/विभागांकडून चित्ररथांचे सादरीकरण करण्यात आले. एका वेगळ्या झांकीनं सर्वांचं मन मोहून घेतलं. तो चित्ररथ म्हणजे संविधाना प्रतिकृती आणि संविधानाचे जनक भीमराव आंबेडकर यांचा आवाज. संविधानाचा चित्ररथ पाहून पंतप्रधान मोदी आपला आनंद रोखू शकले नाहीत आणि त्यांनी हात हलवून चित्रपथाचे स्वागत केले. राज्यघटनेच्या झांकीद्वारे मोदी सरकारनेही विरोधकांना संदेश देण्याचा प्रयत्न ...