भारत, फेब्रुवारी 7 -- RBI Monetary Policy : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ची मॉनिटरी पॉलिसी बैठक नुकतीच पार पडली, असून या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. आरबीआयचे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी नवे पतधोरण जाहीर केले तसेच यावेळी काही घोषणा देखील केल्या. या बाबत त्यांनी पत्रकार परिषद घेऊन बैठकीत चर्चा झालेल्या विषयांवर थोडक्यात माहिती दिली. संजय मल्होत्रा यांनी १० डिसेंबर रोजी गव्हर्नरपदाचा कारभार हाती घेतला. त्यानंतर पहिल्यांदाचत त्यांनी मॉनिटरी पॉलिसीवर बैठक घेतली आहे. या बैठकीत त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना दिलासा दिला आहे. त्यांनी गेल्या पाच वर्षात पहिल्यांदा रेपो दरात कपात केली असून यामुळे गृहकर्जाचा हत्ता आता कमी होणार आहे.

मध्यमवर्गीयांना इन्कम टॅक्समध्ये दिलासा दिल्यावर आता मध्यमवर्गाला स्वस्त कर्जाची भेट आरबीआयने...