भारत, मे 28 -- Rajya Sabha Election: भाषेच्या वादात अडकलेले अभिनेते कमल हासन आता संसदेत प्रवेश करणार आहेत. तामिळनाडूतील सत्ताधारी पक्ष द्रमुकच्या द्रविड मुनेत्र कळघम कोट्यातील एक जागा हासन यांना देण्यात आल्याचे वृत्त आहे. मंगळवारीच, द्रमुकने आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी तीन जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. कन्नड आणि तमिळ भाषेबाबतच्या वक्तव्यांमुळे हासन वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

द्रमुकने आपल्या चारपैकी एक जागा हसन यांचा पक्ष मक्कल निधी मय्यमला देण्याची घोषणा केली आहे. २०१८ मध्ये त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. मात्र, निवडणुकीच्या मैदानात त्यांना फारसे यश मिळाले नाही. द्रमुकने मंगळवारी जाहीर केलेल्या तीन उमेदवारांमध्ये ज्येष्ठ वकील पी विल्सन, लेखिका आणि कवयित्री सलमा आणि माजी मंत्री एस. आर. शिवलिंगम यांचा समाव...