Mumbai, जानेवारी 29 -- Swami Samarth Krida Mandal : गेली सुमारे ८० वर्षे कबड्डी या रांगड्या खेळाचा आवाज बनलेल्या प्रभादेवीतील स्वामी समर्थ क्रीडा मंडळाची राजाभाऊ देसाई स्मृतीचषक कबड्डी स्पर्धा पुन्हा एकदा रंगणार आहे. येत्या ८ फेब्रुवारीपासून सुरू होणारी ही स्पर्धा ११ फेब्रुवारीपर्यंत चालणार असून त्यात १२ व्यावसायिक संघ सहभागी होणार आहेत. या निमित्तानं दिग्गज कबड्डीपटूंचा चढाई-पकडींचा थरार कबड्डीप्रेमींना अनुभवता येणार आहे.

कबड्डीला प्रो कबड्डीची श्रीमंती लाभण्याआधी कबड्डी आणि कबड्डीपटूंना मान-सन्मान मिळवून देण्यात ८१ वर्षांच्या तरुण तडफदार स्वामी समर्थ क्रीडा मंडळाचा मोठा वाटा आहे. ही परंपरा कायम राखत मंडळानं यंदाही विशेष व्यावसायिक गट कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलं आहे. या स्पर्धेत इन्शुअरकोट स्पोर्टस् (युवा पलटन), सेंट्रल बँक, मुंबई महानग...