मुजफ्फरनगर, फेब्रुवारी 7 -- Indian return From US: अमेरिकेत अवैधरित्या घुसलेल्या भारतीयांना एका विशेष विमानाने परत भारतात पाठवण्यात आले आहे. या परत आलेल्या भारतीयांनी त्यांच्यावर बेतलेल्या प्रसंग माध्यमांपुढे कथन केला आहे.

उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमधील पुरकाझी भागातील मरकपूर गावात राहणारा ३८ वर्षीय देवेंद्र याला अमेरिकेतून परत भारतात पाठवण्यात आलं आहे. परदेशात पाठवणाऱ्या गिल टोळीला बळी पडून तो अमेरिकेत पोहोचला होता. मात्र, अमेरिकेच्या पोलिलिसांनी त्याला अटक केली होती. देवेंद्र याला गुरुवारी परत भारतात पोहोचवण्यात आलं. यानंतर तो आपल्या गावी पोहोचला. अमेरिकेत जाण्यासाठी देवेंद्रने आतापर्यंत ४० लाख रुपय परदेशी पाठवणाऱ्या दलाला दिले आहेत. अमेरिकेतील कॅलिफोर्नियायेथे बॉर्डर फोर्स आणि अमेरिकन आर्मीकडून तब्ब्ल २० दिवस त्याचा छळ करण्यात आला. ह...