New delhi, एप्रिल 28 -- तुम्ही अनेक दूधवाले पाहिले असतील, पण लोकांच्या घरी दूध पोहोचवण्यासाठी १ कोटी रुपयांच्या अलिशान कारचा वापर करणारा दूधवाला क्वचितच पाहिला असेल. आम्ही बोलत आहोत हरियाणातील फरिदाबाद येथील अमित भडाना या दूधविक्रेत्याबद्दल. आपली आवड पूर्ण करण्यासाठी अमितने बँकेची चांगली नोकरी सोडली आणि लोकांपर्यंत दूध पोहोचवायला सुरुवात केली.

हरयाणातील फरिदाबादमधील मोहब्बताबाद गावात राहणाऱ्या अमित भडाना यांना बीए केल्यानंतर बँकेत चांगली नोकरी मिळाली. पण, थोड्याच वेळात भडाना यांच्या लक्षात आलं की, बँकेची नोकरी हा आपला छंद जोपासण्यात अडथळा आहे. बँकेत नोकरी असल्याने वाहनांची आवड पूर्ण करता आली नाही, असे त्यांनी सांगितले.

दूध व्यवसायाशी संबंधित कुटुंबातील भडाना यांनी वाहनांची आवड जोपासण्यासाठी कौटुंबिक व्यवसायात सामील होण्याचा निर्णय घेतला...