Mumbai, फेब्रुवारी 11 -- ContractTeachers Recruitment Cancel : राज्य सरकारने शिक्षक भरतीसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारने नुकताच नवीन शासन निर्णय (जीआर) काढत सरकारी शाळांमध्ये १० किंवा दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये कंत्राटी तत्त्वावर शिक्षक नियुक्ती करण्याचा तत्कालीन शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी घेतलेला निर्णय रद्द केला आहे. राज्यभरातील ६ हजार शाळांमधील विद्यार्थ्यांसोबतचा दुजाभाव या निर्णयामुळे दूर होणार आहे. शिक्षण आयुक्तालयाने शिक्षक भरती प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवला असून,ही शिक्षक भरती झाल्यानंतर या शाळांवर कायमस्वरूपी शिक्षक नेमले जातील.

शालेय शिक्षण विभागाने ५ सप्टेंबर २०२४ रोजी २० किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये एक शिक्षक कंत्राटी तत्त्वावर नेमण्याचा ...