जेरूशलम,रॉयटर्स, फेब्रुवारी 11 -- Israel Hamas News : इस्रायल आणि हमास यांच्यात दीड वर्षाच्या युद्धानंतर युद्धबंदी घोषित करण्यात आली होती. या युद्धबंदीमुळे गाझामधील जनतेला काहीसा दिलासा मिळाला असला तरी स्मशानभूमी बनलेल्या शहरात जीवनाच्या शोधात असलेल्या गाझावासीयांच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाही. शस्त्रसंधीअंतर्गत कैदी आणि बंधकांची देवाणघेवाण होत असताना हमासने सोमवारी अचानक इस्रायलच्या बंधकांची सुटका करणार नसल्याचे जाहीर केले. हमासच्या या घोषणेनंतर इस्रायलही संतापला आहे. संरक्षणमंत्र्यांनी लष्कराला पुडील कारवाईसाठी सज्ज राहण्यास सांगून गाझामध्ये मोठी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासने पुढील सूचना मिळेपर्यंत इस्रायली बंधकांची सुटका करणार नसल्याचे सोमवारी जाहीर केले. इस्रायलने ही घटना म्हणजे शस्त्रसं...