Delhi, फेब्रुवारी 6 -- Do Not use chatgpt and deepseek in office : जगभरात सध्या एआय टूल्सची चर्चा आहे. मात्र, देशात अर्थ मंत्रालयाने आपल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये त्यांच्या अधिकृत संगणकावर चॅटजीपीटी आणि डीपसीक सारख्या एआय टूल्सचा वापर करण्यास मनाई केली आहे. या साधनांच्या वापरामुळे सरकारी माहिती आणि कागदपत्रांची गोपनीयता धोक्यात येऊ शकते, असं सरकारचे मत आहे.

या संदर्भात अर्थ विभागाने २९ जानेवारी रोजी जारी नोटीशीफिकेशन जारी केलं आहे. यात म्हटले आहे की, "कार्यालयीन संगणक आणि डिव्हाइसमधील एआय टूल्स आणि एआय अ‍ॅप्स (जसे की चॅटजीपीटी, डीपसीक इ.) सरकारी डेटा आणि कागदपत्रांच्या गोपनीयतेस धोका निर्माण करत असून यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे." त्यामुळे कार्यालयीन उपकरणांमध्ये एआय टूल्स/एआय अ‍ॅप्सचा वापर काटेकोरपणे टाळावा, असा सल्ला द...