भारत, मार्च 25 -- नुकतीच अमेरिकेतील टेक्सासमधून अशी बातमी समोर आली आहे, जी ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. येथील एका पुरुषाला महिलांच्या बाटलीत लघवी करताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दूषित पाणी प्यायल्याने एका महिलेला गंभीर विषाणूची लागण झाली होती, त्यानंतर या व्यक्तीला सहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कोर्टाच्या कागदपत्रांनुसार, ही व्यक्ती ह्यूस्टन मेडिकल फॅसिलिटीमध्ये चौकीदार म्हणून काम करत होती. लुसिओ कॅटरिनो डियाज नावाच्या या व्यक्तीने २०२२मध्ये हे घृणास्पद कृत्य केले होते.

तक्रारीनुसार, ३० ऑगस्ट २०२२ रोजी मा नावाच्या कर्मचाऱ्याच्या लक्षात आले की, कार्यालयातील वॉटर डिस्पेंसरच्या पाण्याला विचित्र चव आणि वास येत आहे. खराब झालेले पाणी पिण्याऐवजी स्वत:ची पाण्याची बाटली आणण्यास सुरुवात केल्याचे महिले...