भारत, फेब्रुवारी 27 -- umbai Heatwave :महाराष्ट्राच्या किनारपट्टीभागात २४ फेब्रुवारीपासून उष्णतेसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने मुंबईते उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. मुंबई आणि आसपासच्या भागात भारतीय हवामान खात्याने २५ आणि २६,२७ फेब्रुवारीसाठी उष्णतेचा इशारा दिला आहे.

सांताक्रूझ येथील हवामान केंद्रात मंगळवारी ३८.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, जी सर्वसाधारण तापमानापेक्षा ५.९ अंश सेल्सिअस अधिक होती आणि १९ फेब्रुवारी २०१७ नंतरचे सर्वाधिक कमाल तापमान ३८.८ अंश सेल्सिअस होते. सोमवारी कमाल तापमान ३८.४ अंश सेल्सिअस होते.

वायव्यभारतातील किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यताही आयएमडीने वर्तवली आहे.

मुंबईत उष्णतेची लाट का येत आहे?

आयएमडी, मुंबईच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी...