Mumbai, फेब्रुवारी 12 -- Mahavitaran Electricity Bill : राज्यातील वीजग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे. महावितरणने वीजदर कपाती संदर्भात प्रस्ताव दिला आहे. हा प्रस्ताव मंजूर होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास ऐन उन्हाळ्यात वीजबीलात मोठी कपात होणार आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी महावितरणने घरगुती वीजदर कमी करण्याचा प्रस्ताव मांडला असून या निर्णयामुळे राज्यातील नागरिकांना कमी दरात वीज मिळणार आहे. महावितरणने दिवसा वीज वापरणाऱ्या ग्राहकांना जास्त सवलत देण्याचा प्रस्ताव दिला आहे. नव्या आर्थिक वर्षात म्हणजेच एप्रिल २०२५ पासून हा प्रस्ताव लागू होणार आहे. राज्यात सौर ऊर्जा उत्पादनाला प्रोत्साहन देण्यात येत असल्यामुळे वीजबिलातील ही घट शक्य हॉट असल्याचे या प्रस्तावाचा आणि निर्णयाचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे.

पेपरला बारकोड लावला...