Pune, फेब्रुवारी 3 -- Pune fake insurance call centre racket : पुण्यातील वाकडेवाडी येथे सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटरचा शिवाजी नगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. आयुर्विमा पाॅलिसीच्या नावाखाली देशभरातील नागरिकांची फसवणूक या कॉल सेंटरमधून केली जात होती. पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणातून आणखी मोठे गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी शंकर कारकून पोखरकर (वय ४२, रा. कात्रज), मेहफूज मेहबुब सिद्दीकी (वय ४०, रा. औंध), अशिष रामदास मानकर (वय ४८, वाघोली) अशी अटक करण्यात आलेल्या तिघा आरोपींची नावे आहेत. आरोपी पोखरकर हा या कॉल सेंटरचा मुख्य सूत्रधार आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून नामांकित ३५ कंपन्यांचे बनावट रबरी शिक्के, १५ मोबाइ...