भारत, एप्रिल 4 -- एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे बाजाराचा मूड खराब आहे. तर एचडीएफसी बँक लिमिटेडच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. खासगी क्षेत्रातील दिग्गज बँकेच्या शेअरमध्ये आज जवळपास ३ टक्क्यांची वाढ झाली आहे. यामागचे कारण बँकेच्या मार्च व्यवसायासंदर्भातील अपडेट असल्याचे मानले जात आहे.

एचडीएफसी बँकेचा शेअर आज म्हणजेच शुक्रवारी बीएसईवर 1808 रुपयांवर उघडला. दिवसभरात कंपनीच्या शेअरचा भाव 2.70 टक्क्यांनी वाढून 1842.20 रुपयांवर पोहोचला. मात्र, यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली आहे. त्यानंतरही खासगी बँकांचे समभाग १२ वाजेनंतर २ टक्क्यांहून अधिक तेजीसह व्यवहार करत होते.

एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, बँकेची एकूण आगाऊ रक्कम 26.40 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. जी वार्षिक आधारावर ५.४ टक्क्यांनी वाढली आहे. ठेवींमध्ये १५.८...