भारत, फेब्रुवारी 5 -- अमेरिकेतील जॉर्जियामधील एका व्यक्तीला अशी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे की, ती पूर्ण करण्यासाठी त्याला अनेक जन्म घ्यावे लागतील. बेकायदा कुत्र्यांची झुंज लावणाऱ्या एका व्यक्तीला ४७५ वर्षांच्या तुरुंगवासाची विचित्र शिक्षा सुनावण्यात आली आहे. ५७ वर्षीय व्हिन्सेंट लॅमार्क यांच्यावर १०० हून अधिक पिटबुल कुत्रे पाळण्याचा आणि त्यांना लढण्यासाठी प्रशिक्षण दिल्याचा आरोप होता. या ऐतिहासिक शिक्षेमुळे अमेरिकेत खळबळ उडाली आहे.

यूएसए टुडेच्या वृत्तानुसार, पॉल्डिंग काउंटी कोर्टात या प्रकरणाची सुनावणी झाली तेव्हा धक्कादायक तथ्य समोर आले. कोर्टाने बुरेलला ९३ वेळा डॉग फायटिंगप्रकरणी दोषी ठरवले गेले, त्यापैकी प्रत्येकाला पाच वर्षांची शिक्षा झाली. याशिवाय १० प्रकरणांमध्ये प्राण्यांवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी आढळल्यास प्रत्येक ...