Mumbai, फेब्रुवारी 5 -- Share Market News : कर्जात बुडालेल्या महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (MTNL) चे शेअर्स आज तब्बल २० टक्क्यांपर्यंत उसळले आहेत. मंगळवार ४७.६४ रुपयांवर बंद झालेला हा शेअर आज थेट ५७.१६ रुपयांवर पोहोचला. केंद्र सरकारच्या एका संभाव्य निर्णयाच्या बातमीमुळं शेअरमध्ये ही तेजी आली आहे.

'सीएनबीसी आवाज'नं दिलेल्या वृत्तानुसार, केंद्र सरकारनं कंपनीच्या १६,००० कोटी रुपयांच्या मालमत्तेच्या मुद्रीकरणाला (Asset Monetisation) मंजुरी दिली आहे. त्यामुळं कर्जाची परतफेड आणि ऑपरेशनल पुनर्रचनेचा मार्ग मोकळा झाला आहे. याशिवाय, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात सर्व सरकारी माध्यमिक शाळा आणि आरोग्य केंद्रांना ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी नवीन योजनेची घोषणा केली. त्याचाही परिणाम शेअरवर झाला आहे. अवघ्या दोन दिवसात हा शेअर...