Mumbai, फेब्रुवारी 12 -- Uddhav Thackeray Unhappy over Sharad Pawar : दिल्ली येथे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं मंगळवारी आयोजित एका कार्यक्रमात शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला होता. या कार्यक्रमावरून आता राज्याच्या राजकारणात पडसाद उमटू लागले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर आज पत्रकार परिषद घेत टीका केली होती. त्यानंतर आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील शरद पवार यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

दिल्लीत शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला. या कार्यक्रमात शरद पवार व एकनाथ शिंदे यांनी एकमेकांचे कौतुक देखील केले. मात्र, या कार्यक्रमावरून ठाकरे गटात अस्वस्थता पसरली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या सत्कार सोहळ्यावरुन...