भारत, एप्रिल 9 -- दिल्लीहून बँकॉकला जाणाऱ्या एअर इंडियाच्या एआय २३३६ या विमानाच्या बिझनेस क्लासमधील एका पुरुष प्रवाशाने एका खासगी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर लघवी केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. एअर इंडियाने या घटनेला दुजोरा दिला आणि सांगितले की क्रूने पीडितेला तक्रार दाखल करण्यासाठी मदत करण्याची ऑफर दिली होती. मात्र, त्यांनी नकार दिला. विमान बँकॉकमध्ये उतरत असताना ही घटना घडली. यापूर्वी नोव्हेंबर २०२२ मध्ये एअर इंडियाच्या विमानात लघवी केल्याचा प्रकारही समोर आला होता.

प्रकरण चिघळल्यानंतर प्रवाशाने पीडिताची माफीही मागितली आहे. एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, एअर इंडियाने पुष्टी केली आहे की, ९ एप्रिल रोजी दिल्लीहून बँकॉकला जाणाऱ्या एआय २३३६ या विमानाचे नियंत्रण करणाऱ्या केबिन क्रूला एका बेशिस्त प्रवाशाच्या वर्तनाची माहिती द...