Thane, एप्रिल 25 -- विदर्भातील आदिवासी भागात शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या उन्नती शिक्षण संस्थेने दहा वर्षे पूर्ण केली असून या निमित्ताने दशवार्षिक सोहळ्याचे आयोजन ठाणे येथे करण्यात आले आहे.

यानिमित्ताने "आदिवासी जीवनातील ज्ञान परंपरा आणि लोकजीवन" यावर एक परिसंवाद आयोजित केला असून त्याला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ व लेखक डॉ. मिलिंद बोकील तसेच लोकसंस्कृतीचे अभ्यासक डॉ श्रीकृष्ण काकडे हे वक्ते म्हणून उपस्थित राहतील.

यावेळी भाषा प्रदर्शनी, पुस्तक प्रकाशन आदी कार्यक्रमही होणार आहेत. साडेपाच ते आठ या दरम्यान ठाणे रहेजा गार्डन क्लब हाऊस येथे हा कार्यक्रम होणार आहे. तो सर्वांना खुला आहे.

शनिवारी (२६ एप्रिल २०२५) रोजी सायंकाळी ५ ३० ते ८ या वेळेत क्लब हाउस, रहेजा गार्डन सोसायटी, लाल बहादूर शास्त्री (LBS) मार्ग, टीप TOP प्ला...