Raipur, फेब्रुवारी 11 -- High Court News : छत्तीसगड उच्च न्यायालयाने बलात्कार किंवा अनैसर्गिक लैंगिक संबंधांबाबत सोमवारी महत्वाचा निकाल दिला. संज्ञान असलेल्या पत्नीसोबत संमतीने किंवा संमतीशिवाय लैंगिक संबंध ठेवल्याबद्दल पुरुषावर बलात्कार किंवा अनैसर्गिक लैंगिक संबंधांचा आरोप लावता येणार नाही, असे महत्वाचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. या निकालानंतर न्यायालयाने अपीलकर्त्याची भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ आणि ३७७ अन्वये सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता केली आणि त्याची तुरुंगातून तात्काळ सुटका करण्याचे आदेश दिले.

न्यायमूर्ती नरेंद्र कुमार व्यास यांच्या एकलपीठाने म्हटले आहे की, लैंगिक संबंध किंवा अनैसर्गिक संभोगात पत्नीची संमती नगण्य मानली जाते. त्यामुळे पत्नीचे वय १५ वर्षांपेक्षा कमी नसेल, तर पतीने पत्नीसोबत केलेले लैंगिक संबंध बलात्कार म्...