Mumbai, मार्च 28 -- यंदाचा 'झी नाट्य गौरव पुरस्कार २०२५' सोहळा हा खूप अविस्मरणीय असणार आहे. याचसोबत ह्या सोहळ्यात अनेक गोड सरप्राइझेस या नाट्यगौरवच्या निमित्ताने रसिकांना पाहायला मिळणार आहेत. 'अतुल तोडणकर' आणि 'अद्वैत दादरकर' उघडले स्वर्गाचे दारच्या प्रवेशातून अतुल परचुरे ह्यांना श्रद्धांजली वाहणार आहेत. ह्या भावुक क्षणात अनेकांचे डोळे पाणावणार आहेत. तसेच ह्यावर्षीचे जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी आहेत, प्रकाश बुद्धीसागर यांना मिळणार आहे.

मराठी रंगभूमीची आयुष्यभर सेवा करणारी अनेक नाटकवेडी माणसं आपण पाहिली असतील. पण मराठी रंगभूमी हेच ज्यांचं आयुष्य आहे असे ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक आणि रंगकर्मी म्हणजे 'प्रकाश बुद्धीसागर'. त्यांच्या बोलण्यातून गेली कित्येक दशकांच्या नांदीचा स्वर दरवळतो. तर त्यांच्या नुसत्या उपस्थितीने देखील नाट्यगृह अगदी धुपासा...