Delhi, जानेवारी 29 -- ISRO launches NVS 02 : भारतीय अंतराळ आणि संशोधन संस्थेने (इस्रो) आज श्रीहरिकोटा येथील अंतराळ केंद्रातून पुन्हा नवा इतिहास रचला. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) आपली १०० वी मोहीम अर्थात जीएसएलव्ही रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण केलं आहे. या मोहिमेतून देशाची नेव्हिगेशन यंत्रणा मजबूत करणारा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला आहे. इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायणन यांच्या नेतृत्वातील ही पहिली मोहीम होती. त्यांनी १३ जानेवारी रोजी पदभार स्वीकारला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिओसिंक्रोनस सॅटेलाइट लाँच व्हेइकलने (जीएसएलव्ही) स्वदेशी क्रायोजेनिक प्रक्षेपकाच्या माध्यमातून आपल्या १७ व्या उड्डाणात आज बुधवारी (दि २९) सकाळी ६ वाजून २३ मिनिटांनी येथील दुसऱ्या लाँच पॅडवरून यशस्वी उड्डाण केले.

इस्रोने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, 'जीए...