भारत, जानेवारी 22 -- ७ ऑक्टोबर २०२३ रोजी 'हमास'ने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यात शेकडो इस्त्रायली नागरिक ठार झाले होते. या हल्ल्यात २०० हून अधिक इस्त्रायली नागरिकांचे अपहरण करण्यात आले होते. सुरक्षेतील या चुकीसाठी इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू हे जबाबदार असल्याचा ठपका ठेवत इस्रायल डिफेन्स फोर्सेसचे चीफ ऑफ जनरल स्टाफ हर्झी हालेवी यांनी राजीमाना दिला आहे. गाझा पट्ट्यामध्ये शस्त्रसंधी लागू झाल्यानंतर दोनच दिवसांनी इस्त्रायली लष्कराच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने राजीमाना दिल्याने इस्त्रायलमध्ये गाझा युद्धावरून इस्रायलमध्ये वरिष्ठ स्तरावर असलेला बेबनाव उघड झाला आहे.

'हमास'च्या या हल्ल्यानंतर इस्त्रायल-हमासदरम्यान तब्बल १५ महिने युद्ध सुरू होते. इस्त्रायलच्या गाझावरील हल्ल्यानंतर ५० हजारापेक्षा जास्त पॅलेस्टिनी नागरिक मारले गेले होते. ...