New Delhi, जानेवारी 29 -- Ethanol Price News : सी-ग्रेड गुळापासून काढल्या जाणाऱ्या इथेनॉलच्या किंमतीत वाढ करण्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारनं आज घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीच्या बैठकीत दरवाढीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. या निर्णयामुळं सरकारच्या इंधन मिश्रण कार्यक्रमाला मदत होणार असून शेतकऱ्यांना अधिकचा भाव मिळणार आहे.

नव्या निर्णयामुळं इथेनॉलची किंमत २.५ टक्क्यांनी वाढून ५७.९७ रुपये प्रति लिटर होणार आहे. केंद्र सरकारनं दिलेल्या माहितीनुसार, इथेनॉल मिश्रणामुळं गेल्या १० वर्षांत (२०१४-१५ ते २०२३-२४) परकीय चलनाची अंदाजे १४.४ अब्ज डॉलरची बचत झाली आहे.

जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या तेल आयातदार असलेल्या भारताचं परदेशी पेट्रोलियम खरेदीवरील अवलंबित्व...