New Delhi, फेब्रुवारी 24 -- AAP Congress Seat Sharing Final : नितीश कुमार यांच्या पलटीनंतर 'इंडिया' आघाडी विस्कळीत होईल असं बोललं जात असतानाच या आघाडीतील पक्षांचे सूर पुन्हा जुळू लागले आहेत. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि काँग्रेस एकत्र आल्यानंतर आता आम आदमी पक्ष व काँग्रेसचंही जुळलं आहे. दोन्ही पक्षांनी चार राज्यांतील जागावाटपही जाहीर केलं आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्ष आणि काँग्रेसनं शनिवारी युतीवर शिक्कामोर्तब केलं. दिल्लीसह गुजरात, हरयाणा आणि गोव्यातील जागावाटपही दोन्ही पक्षांनी निश्चित केलं आहे. गुजरातमध्ये काँग्रेस २४, आप २, हरयाणात काँग्रेस ९, आप १ जागा, दिल्लीत 'आप' ४, काँग्रेस ३ जागांवर निवडणूक लढणार आहे.

Lok Sabha Election : दक्षिण मुंबईत भाजपचं मराठी कार्ड; राहुल नार्वेकर लोकसभा लढणार! काय आहे रणनीती?

गुजरातमध...