Mumbai, फेब्रुवारी 12 -- Indias Got latent : रणवीर अलाहाबादिया याच्या 'इंडियाज गॉट लॅटेंट' या यूट्यूब शोमध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अपूर्वा मुखीजासह चौघांची बुधवारी चौकशी करत त्याचे जबाब नोदवून घेतले. खार पोलिस स्टेशनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, अलाहाबादियाहि याचा जबाब नोंदविला जाऊ शकला नाही. मुखीजा या रिॲलिटी शो ची भाग होती. अपूर्वा आणि आशिष चंचलानी यांनी या शोबद्दल सांगितले आहे की, हा शो स्क्रिप्टेड नाही आणि परीक्षकांना मानधन दिले जात नाही.

सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अपूर्व मुखीजा आणि यूट्यूबर आशिष चंचलानी यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, हा शो स्क्रिप्टेड नाही. शोमध्ये परीक्षक आणि स्पर्धकांना मोकळेपणाने बोलण्यास सांगितले जाते. इंडियाज गॉट लॅटेंट या शोमध्ये परीक्षकांन...