Delhi, फेब्रुवारी 3 -- Viral News : कोलोरॅडोमध्ये एका तरुणीला प्रियकराची हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं आहे. हत्येचे कारण देखील धक्कादायक आहे. प्रियकराने प्रेयसीने इंटरव्ह्यू चांगला दिला नाही म्हणून टीची मज्जा उडवली. यामुळे संतापलेल्या प्रेयसीने सुपारी देऊन त्याची हत्या केली. आरोपी हा तरुणीला बस प्रवासात भेटला होता. यावेळी तिने त्याला प्रियकराला मारण्याची सुपारी दिली.

अ‍ॅश्ले व्हाईट असे या २९ वर्षीय तरुणीचे नाव आहे. तर कोडी डेलिसा असे हत्या करण्यात आलेल्या प्रियकरांचे नाव आहे. अ‍ॅश्लेला तिच्या प्रियकरांची हत्या केल्याच्या आरोपा खाली दोषी ठरवण्यात आले होते. डेलिसाने व्हाईटची खिल्ली उडवत म्हटले होते की, "तुला चांगली नोकरी मिळेल की नाही ही शंका आहे.' त्यामुळे अ‍ॅश्लेला राग आला होता. या रागाच्या भरात तिने हे कृत्य केल्याचे तिने कोर्टा...