भारत, सप्टेंबर 25 -- Gondia Students: गोंदियातील आश्रमशाळेचा बेजबाबदारपणा समोर आला असून आता याबाबत संताप व्यक्त केला जात आहे. एका ट्रकमधून तब्बल १२० मुलांना नेण्यात आल्याची घटना घडली आहे. यामुळे काही विद्यार्थी श्वास गुदमरल्याने बेशुद्ध झाले. गोंदियाच्या मजितपूर शासकीय आदिवासी आश्रमशाळेत ही घटना उघडकीस आली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, गोंदियातील मजितपूर शासकीय आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना खेळण्याच्या स्पर्धेसाठी नेण्यात येत होतं. १२० विद्यार्थ्यांना एकाच ट्रकमध्ये बसवून नेलं जात होतं. तेव्हा कोयलारी इथून परत येत असताना काही विद्यार्थी बेशुद्ध पडले. यानंतर विद्यार्थ्यांना एकोडी इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले गेले.

मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी ट्रकमध्ये बसवल्याने त्यांचा श्वास गुदमरला. यामुळे अस्वस्थ व...