भारत, जानेवारी 26 -- गायिका आशा भोसले यांची नात जनाई भोसले अनेकदा त्यांच्यासोबत पाहायला मिळते. ही आजी आणि नातीची जोडी अनेकदा एकत्र पाहायला मिळते. सध्या सोशल मीडियावर जनाईच्या काही फोटोंची चर्चा रंगली आहे. खरंतर जनाईने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला. दरम्यान, एका फोटोने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या फोटोमध्ये जनाई ही क्रिकेटपटू मोहम्मद सिराज दिसत आहे. त्यामुळे नेटकऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

जनाईने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर वाढदिवस साजरा करतानाचे फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत ती केक कापत असून आशा भोसले-जॅकी श्रॉफ तिच्या शेजारी उभे आहेत. दुसऱ्या फोटोत तिच्यासोबत क्रिकेटपटू मोहम्मद सिराज दिसत आहे. दोघेही हसत हसत एकमेकांकडे पाहत आहेत. या दोघांमध्ये काही तरी सुरू असल्याचा अंदाज चाहते हे फोटो पाहून लावत आहेत. सोश...