प्रयागराज, जानेवारी 29 -- Mahakumbh stampede : कुंभमेळ्यात आज मौनी अमावस्या साजरी होत असताना संगमावर बुधवारी पहाटे १ वाजता चेंगराचेंगरी झाली. या घटनेत १५ भविकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रयागराज येथील परिस्थितीचा आढावा घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत महत्वाच्या सूचना दिल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवरून संपर्क साधून प्रयागराज येथील परिस्थितीतीचा आढावा घेतला तसेच तातडीने मदत कार्य राबवण्याचे आवाहन केले. प्रयागराजमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीनंतर गर्दी नियंत्रणासाठी आरएएफ तैनात करण्यात आले आहे.

कुंभमेळा प्राधिकरणाच्या विशेष कार्यकारी अधिका...