नई दिल्ली, फेब्रुवारी 11 -- इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनमध्ये (EVM) साठवलेली माहिती तूर्तास नष्ट करू नका, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले आहेत. निवडणुकीनंतर ईव्हीएमच्या पडताळणी संदर्भातील एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने हा मोठा आदेश दिला आहे. सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने म्हटले की, सध्या तरी ईव्हीएममधील कोणताही डेटा डिलीट करू नका किंवा त्यात कोणताही नवीन डेटा पुन्हा लोड करू नका.

मतदान संपल्यानंतर इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनसाठी (ईव्हीएम) स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर काय आहे, अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला केली आहे. आता निवडणूक आयोगाला निवडणुकीनंतर ईव्हीएम मेमरी आणि मायक्रो कंट्रोलर प्रक्रियेची माहिती न्यायालयाला द्यावी लागणार आहे. मतमोजणी संपल्यानंतरही मशिनमधील डेटा नष...